फापोरे बु. येथील शेत पाणंद रस्त्याचे काम निकृष्ट , चौकशी करण्याची मागणी
अमळनेर :-
फापोरे बु. ता. अमळनेर येथील सिताराम महाराज मंदीर समोरील शेत पाणंद रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार करण्यात आला असून शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
फापोरे बु. येथील नुकताच तयार करण्यात आलेल्या शेत पाणंद रस्ता हा शेतकऱ्यांचा दृष्टीने पाहिजे त्या प्रमाणात काम न करता नित्कृष्ट प्रतीचा तयार करण्यात आला आहे. बऱ्याच ठिकाणी खडी दिसत असून मुरूम पाहिजे त्या प्रमाणात टाकण्यात आला नाही. तर काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी पाईप टाकणे गरजेचे असताना, पाईप न टाकता रस्ता पुर्ण करण्यात आला आहे. शेत पाणंद रस्ता ही योजना शेतकऱ्याच्या मोठ्या फायद्याची आहे. मात्र कामे अशी होत असतील तर शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ जास्त दिवस घेता येणार नाही असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे.या नित्कृष्ठ कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

