परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
पारोळा :- येथील चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
अधीक्षक,कुटीर रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रानडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यावेळी डॉ.जिनेंद्र पाटील(वैद्यकीय अधिकारी, कुटीर रुग्णालय,पारोळा),डॉ. प्रशांत सोनवणे(दंत शल्य चिकित्सक, कुटीर रुग्णालय,पारोळा),श्री.थोरात साहेब(नगरपालिका. पारोळा),श्री.भामरे साहेब(नगरपालिका पारोळा),मोहम्मद खान(अध्यक्ष,सेवा फाउंडेशन),सलीम मुजावर(सेक्रेटरी, सेवा फाउंडेशन),श्री. वाघ बाबा, पारोळा, श्री. गणेश महाजन, पारोळा, मा.श्री.अण्णासो.डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर(संस्थापक अध्यक्ष-चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर,धुळे)आदि मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष आण्णासो.डॉ.योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या हस्ते आलेल्या सर्व मान्यवरांचा स्वागत करण्यात आले.संस्थेच्या अध्यक्षांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनिष जाधव सर यांनी केला.त्यावेळी शाळेतील विशेष विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व नृत्य सादर केली. स्वातंत्र्य लढ्यातील महात्म्यांना विशेष विद्यार्थी व विशेष शिक्षकांनकडुन वेशभूषा सादरीकरण करुन अभिवादन करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक श्री.मनिष जाधव सरांनी देशभक्तीपर गीत गाऊन सर्वांचा उत्साह वाढवला.विशेष विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याद्वारे आलेल्या मान्यवरांना मानवंदना दिली.त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग क्रीडा स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते मुलांना शालेय साहित्य वाटप व खाऊ वाटप करण्यात आले. सर्व उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षांच्या कामाचं तसेच शाळेच्या सर्व स्टाफ च्या मेहनतीचे कौतुक केलं.सुत्रसंचालन श्री.जगदीश सोनवणे सर यांनी केले.त्यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते.

