भव्य तीन दिवसीय नि:शुल्क योग शिबीराचे आयोजन
अमळनेर :-
येथील शहरात भव्य तीन दिवसीय नि:शुल्क योग शिबीराचे आयोजन पतंजली योगपीठ संचलित महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र पूर्व, तालुका अमळनेर द्वारा करण्यात आले आहे.
हृदय रोग, उच्च रक्तदाब, कंबर दुखी, एकाग्रता वाढविणे, संधीवात, मधुमेह, इतर रोग निवारणा साठी महिला- पुरुष, मुलामुलींसाठी निशुल्क योग शिबीराचे आयोजन ता. २२ जानेवारी ते २४ जानेवारी करण्यात आले आहे. याप्रसंगी या योग शिबिराचे उदघाट्न आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. खासदार स्मिता वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, ‘योगरत्न पुरस्कार’ राज्य प्रभारी महाराष्ट्र पूर्व संजीवनी माने, ‘योगरत्न पुरस्कार’ राज्य कार्यकारिणी सदस्या महानंदा पाटील, योगभूषण पुरस्कार प्राप्त जयश्री पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
२२ जानेवारी रोजी सकाळी ५. ३०ते ७. ०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे सुरुवात होईल. या शिबिराला योगशिक्षक गजानन माळी सर, योगशिक्षिका सौ ज्योती पाटील,रत्ना भदाणे,कामिनी पवार, आरती पाटील तसेच संदीप घोरपडे सर यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

