ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न
चोपडा– येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन- ‘कार्निवल 2024-25’ मधून भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचे अनोखे दर्शन घडविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. स्वागतगीत आणि गणेश वंदना सादर करण्यात आली. याप्रसंगी कविता भीमराव सुर्वे (गटशिक्षणाधिकारी, चोपडा) आणि सुषमा श्रीनाथ कांची ( जिल्हा समन्वयक सीबीएसई, जळगाव), संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, महेंद्र पाटील, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी, हितेंद्र देशमुख, संदेश क्षीरसागर, डॉ. राजेंद्र महाजन, डॉ. अजय पाटील, डॉ. रवींद्र पाटील, तुळशीराम पाटील, राजू थोरात, मनोज पाटील, लीना पाटील आणि शाळा समन्वयक निळकंठ सोनवणे, प्रा. डाॕ. दीनानाथ पाटील, प्रा. दीपक सोमानी, प्रा. अशोक साळुंखे, मनेष देसले, शाळेच्या मुख्याध्यापिका ममता न्याती इ. उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी मांडली. ममता न्याती यांनी शाळेच्या यशस्वी उपक्रमांबद्दल आणि विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशासंदर्भात माहिती दिली. याप्रसंगी कविता भीमराव सुर्वे (गटशिक्षणाधिकारी, चोपडा) आणि सुषमा श्रीनाथ कांची ( जिल्हा समन्वयक सीबीएसई, जळगाव) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. रवींद्र पाटील, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी, एन. एस. सोनवणे, प्रा. डॉ. डी. एस. पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले. शाळेतील विद्यार्थी प्रमुख अभिनव अशोक साळुंखे व शार्ली रामकृष्ण महाजन यांनी मनोगत वक्त केले. इयत्ता आठवीची विद्यार्थिनी पुरंदरी करंदीकरने देखील मनोगत व्यक्त केले.
पूर्व प्राथमिक विभाग ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्यांच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट असे सादरीकरण केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोशल मीडियाचा समाज जीवनावर होणारा विधायक व विघातक परिणाम, महाभारतातील प्रसंग, भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव आणि एकलव्याचा जीवनावर आधारित प्रसंग, मैत्रीचा संदेश देणारे, विनोदी सादरीकरण, राष्ट्रभक्तीपर सादरीकरण तहानलेला कावळा – बालनाटिका प्रस्तुत करण्यात आले. महाराष्ट्रीय जोगवा गुजराथी, तमिळ, पंजाबी सारख्या विविध भाषांच्या नृत्य प्रकारातून विद्यार्थ्यांनी त्यांची कला सादर केली.
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध स्तरावर प्राप्त केलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी बक्षीस वितरण करण्यात आले.
शाळेतील 2022 साली उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थी मेडिकल कॉलेज, 18 विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेज, 1 विद्यार्थिनी प्राॅडक्ट डिझाईन, एक विद्यार्थिनी फॅशन डिझाईन, 2 विद्यार्थी सीए, 6 विद्यार्थी कॉमर्स, 6 विद्यार्थी बी.सी.ए., 2 विद्यार्थी बी.एस सी., 1 विद्यार्थिनी एल.एल बी, 3 विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंग, 1 विद्यार्थिनी बी.एफ.ए., 2 विद्यार्थी बी.ए, तर इतर विद्यार्थी डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, कंप्यूटर इंजीनियरिंग यांसारख्या विविध नामांकित शाखांमध्ये प्रविष्ट झाले आहेत. नामांकित शाखांमध्ये प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शालेय स्नेहसंमेलनात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 2024 साली उत्तीर्ण झालेल्या पूर्वी पवन अग्रवाल ( प्रथम क्रमांक), दिव्य हितेश जैन (द्वित्तीय क्रमांक), राजवीर प्रशांत पाटील (तृतीय क्रमांक) आणि स्पंदन उत्तम सोनकांबळे (चतुर्थ क्रमांक ) या विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय पातळीवर बेसबॉल या क्रीडा प्रकारासाठी निवड झालेल्या इयत्ता नववीचा विद्यार्थी दिव्यतेज अतुल पाटील आणि खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट सर्च अंतर्गत धावणे या क्रीडा प्रकारासाठी कुणाल संदीप वाडे या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेतील द्वितीय फेरीसाठी पात्र ठरलेल्या दक्ष प्रवीण जयस्वाल आणि आराध्या चंद्रशेखर वानखेडे या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. नॅशनल सायन्स ओलंपियाड परीक्षेमध्ये द्वितीय फेरीसाठी पात्र ठरलेल्या आराध्या चंद्रशेखर वानखेडे, सिद्धी चंद्रकांत पाटील, श्रीजा प्रदीप लासुरकर, दक्ष प्रवीण जयस्वाल, पारस महेंद्र पाटील आणि इंटरनॅशनल मॅथस् ओलंपियाड परीक्षेमध्ये द्वितीय फेरीसाठी पात्र ठरलेल्या लवीन लालचंद पटले, मयंक शशांक पाटील, अपूर्व समाधान सूर्यवंशी, शिवम दीपक पाटील, प्राची समाधान कोळी
या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
रंगोत्सव सेलिब्रेशन : ऑर्गनायझेशन फॉर नॅशनल लेवल आर्ट कॉम्पिटिशन, या संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेमध्ये रंगभरण, कोलाज, सुंदर हस्ताक्षर, टॅटू मेकिंग या विविध कला प्रकारामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले. कनिष्का शुभम पाटील वैष्णवी नवल शिरसाठ, सारा अजित पाटील, अनुष्का प्रशांत पाटील यशस्वी विद्यार्थ्यांना या समारंभात सन्मानित करण्यात आले. कलाशिक्षक शकील अहमद यांना रंगोत्सव तर्फे ललित कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि प्रिन्सिपल ममता कपिल न्याती यांना रंगोत्सव तर्फे आर्ट अँड एज्युकेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, विशाल मराठे, सलोनी अग्रवाल, वैशाली गायकवाड, हर्षा पाटील, कल्पना संजय बारी, अश्विनी खंडेराव पाटील या शिक्षकांनी व इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुचिता पाटील, दीप्ती पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अनुषंगाने शाळेतील कलाशिक्षक शकील अहमद यांनी आकर्षक फलक रेखाटन केले. शाळेतील नृत्य शिक्षिका दिपाली पाटील यांनी विविध नृत्य प्रकारांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वागत गीतासाठी शाळेतील संगीत शिक्षिका अश्विनी ढबू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा आशा पाटील, संस्थेच्या सचिव डाॅ. स्मिता पाटील, सहसचिव प्रा. डाॅ. डी. ए. सूर्यवंशी, शाळा समन्वयक एन. एस. सोनवणे, प्रा. डाॅ. डी. एस. पाटील,अशोक साळुंखे, प्रा. विलास दारूंटे, प्रा. डी. जी. सोमानी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती आणि अश्विनी खंडेराव पाटील, दिपाली नरेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

