अमळनेर तहसील कार्यालयातून चोरी झालेल्या ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा २४ तासात उघडकीस आणुन आरोपीतास अटक
:-
अमळनेर महसुल विभागाकडून लक्ष्मण शांतीलाल भिल याचे अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह कारवाई करीता अमळनेर तहसील कार्यालयात लावण्यात आले होते.
दि. १४ रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अमळनेर तहसील कार्यालयातून वाळूने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली हे चोरून नेले अमळनेर पोलीस ठाण्यात गु.र.नं १८/२०२५ भा.न्या.सं.३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडील पथकास अमळनेर पोलीस स्टेशनला गु.र.नं.१८/२०२५ भा.न्या.सं.३०३(२) या गुन्ह्यातील चोरीस गेलेले ट्रॅक्टर हे मालक लक्ष्मण भिल याचा लहान भाऊ कमलेश उर्फ कल्पेश भिल रा. मोहाडी ता. जि. धुळे यानेच चोरून घेवून गेला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने मोहाडी गावात जावून कमलेश उर्फ कल्पेश भिल याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव कमलेश उर्फ कल्पेश शांतीलाल भिल, वय २०, रा.मोहाडी ता.जि.धुळे असे सांगितल्याने त्यास विश्वासात घेवून विचारपुस करुन त्याचे कडून १,६३,०००/- रु. किमतीचे निळया रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व ट्रॉली अर्धा ब्रास रेतीने भरलेली असे जप्त करून त्यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी अमळनेर पोलीस स्टेशनला ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.श्री महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड, यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई ही पो.ह.संदिप पाटील, गोरख बागुल, प्रविण मांडोळे, राहुल कोळी सर्व नेमणूक स्था.गु.शा.जळगाव अश्यांनी केली आहे.

