वसंतनगर आश्रम शाळेत राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त प्रतिमापूजन,
राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सजीव देखावा सादर
पारोळा :-
आज ता. 12जानेवारी रोजी वसंतनगर ता. पारोळा येथील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळेत राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रतिमापूजन करीत कार्यक्रम मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी राजमाता जिजाऊ , छत्रपती शिवाजी महाराज यांचा सजीव देखावा विद्यार्थ्यासमोर हुबेहूब सादर करण्यात आला. यात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यावर इयत्ता नववी, दहावी व जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थी -विध्यार्थिनींनी पुष्पवृष्टी करीत स्वागत केले.
संगीताच्या गजरात पुष्पवृष्टी होतांना राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज यांचे झालेले आगमनाने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते. यानंतर शाळेच्या पटांगणात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला सामूहिक आदरांजली देण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या श्रीमती एल. एस. पाटील तर मुख्याध्यापक सोपान पाटील, जेष्ठ शिक्षक एस. जे. भामरे, एम. डी. सूर्यवंशी,डी. एस. पाटील, के. आर. पाटील, बी. पी. पाटील, आर. सी. चौधरी, डी. एम. बडगुजर यांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.इयत्ता बारावीचा विद्यार्थी कृष्णा चव्हाण याने शिवाजी महाराज, अफजल खान भेटीप्रसंगीतला पोवाडा सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हिरालाल पाटील, सूत्रसंचालन पी.एच. निकुंभे, तर आभार प्रा. नितीन चव्हाण यांनी मानले.

