कुंभकर्णी झोपेचे सोंग घेणाऱ्या पालिकेला मनसेचे निवेदन
भालेराव नगरातील व्हालचा खड्डा दुर्लक्षित, जीव घ्याल का?
अमळनेर:-
शहरातील धुळे रस्त्यालगत भालेराव नगरमध्ये पाण्याचा व्हालचा खड्डा जीवघेणा झाला आहे. या खड्ड्यावर बसविलेली लोखंडी जाळी तुटल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुरुस्तीसाठी कुंभकर्णी झोप घेणाऱ्या नगरपालिका प्रशासनाला निवेदन देत
बऱ्याच दिवसांपासून ही समस्या असून झोपेचे सोंगेतून बाहेर पडून खड्ड्यावरील जाळी दुरुस्ती करा भालेराव नगरमधील मुख्य रस्त्यावरून रोज हजारो नागरिक, विद्यार्थी ये-जा करतात, त्यामुळे जाळीचे नुकसान नुकसान होताच अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. अजूनही नगर परिषदेने दखल न घेतल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी वेवोतोलू केजो (आय. ए. एस.)अमळनेर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पाटील, शहराध्यक्ष धनंजय साळुंखे यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनाने लागलीच दुरुस्ती करून रस्ता सुरक्षित करावा असेही सांगितले. या समस्याला केल्यास नागरिकांसाठी अपघातांची शक्यता नाकारता येणार नाही.

