जागतिक पारायण दिनानिमित्त गजानन महाराज मंदिरात सामुहिक पारायण, महिला भविकांचा सहभाग
अमळनेर :-
येथील जी.एम. सोनार नगरमधील संत गजानन महाराज मंदिरात जागतिक पारायण दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी वारीप्रमुख श्रीमती ज्योतीताई पवार यांच्यासह महिलाभक्तांनी सामूहिक पारायणाचे आयोजन केले होते.
यावेळी संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे वाचन महिलांनी एकत्र येत सामूहिक पारायण वाचन केले.
संत गजानन महाराज मंदिरात सकाळी साडे सहा वाजता पारायणला महीला भगिनी व बांधव यांनी पारायणाला सुरुवात केली.गजानन महाराज विजय ग्रंथाचे वाचन महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार यांनी केले.
यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. महिला भक्तांनी एकत्र येऊन विजय ग्रंथाचे वाचन केले.
सामूहिक पारायणानंतर दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात आली. कार्यक्रमानंतर उपस्थित भविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी कार्यक्रमाला गजानन महाराज सेवा संस्थांनचे अध्यक्ष प्रा. आर बी पवार, अशोक भावे महाराज,नितीन भावे,सेवेकरी रघुनाथ पाटील ,मोहीत पवार आदी गजानन परिवारातील महिला भगिनी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

