जानवे विकास सोसायटी चेअरमन पदी पितांबर पाटील यांची निवड
अमळनेर
तालुक्यातील जानवे गावातील विविध कार्यकारी सोसायटीत ठरल्याप्रमाणे श्री योगेश शिवाजी पाटील यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने, सोसायटी चेअरमन पद रिक्त झाले होते. काल ता.11 जानेवारी 2025 रोजी झालेल्या विकास सोसायटी निवडणुकीत, श्री पितांबर देवराम पाटील यांची चेअरमन म्हणून व चंद्रकांत ओंकार पाटील यांची व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध, एकमुखाने निवड करण्यात आली. श्री पितांबर पाटील यांनी जानवे, अटाळे , रणाईचे, डांगर, पिळोदे अशा अनेक गावात सेक्रेटरी म्हणून उत्कृष्ट कार्य केले होते. मनमिळाऊ, मितभाषी व नेहमी कामात मग्न असलेल्या, पितांबर आप्पांना चेअरमन म्हणून योग्य तो न्याय मिळाला. त्यांचे सर्व सोसायटी सभासदांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री एस टी महाजन यांनी काम पाहिले.

