श्रीमती गजेश्री पाटील लिखित पत्र मित्र भावसार काका पुस्तकाला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक
पारोळा :-
जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे आयोजित ग्रंथालय उपक्रम सन २०२४-२५ अंतर्गत जिल्हा परिषद कन्या शाळा कळमडू तालुका चाळीसगाव शाळेतील उपशिक्षिका श्रीमती गजेश्री दगडू पाटील यांनी इयत्ता चौथी – पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या ” पत्रमित्र भावसार काका ” या पुस्तकाला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
या छोटेखानी २३ पानी पुस्तकात श्रीमती गजेश्री पाटील यांनी पारोळा येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांचे जीवन, सेवा, कार्य,पत्र लेखनाचा छंद, उपक्रम, शैक्षणिक व सामाजिक कार्यात तन- मन- धनाचे योगदान आदर्श शिक्षक म्हणून मिळालेले पुरस्कार व कोरोना योद्धा म्हणून मिळालेली सन्मान पत्रे इत्यादी बाबतीत उत्तम प्रकारे मांडणी केली आहे.
या पुस्तकाला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्याने श्रीमती गजेश्री पाटील व पत्रमित्र भावसार काकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

