देवळी येथून दोन म्हशीचे वासरे चोरी
अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमळनेर :-
देवळी ता. अमळनेर येथील शेतकरी रामकृष्ण लोटन पाटील यांच्या मालकीचे सुमारे वीस हजार रुपये किमतीचे म्हशीचे दोन वासरू चोरी गेल्याने आज ता. 10 रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, रामकृष्ण लोटन पाटील यांचे देवळी गावालगत गट क्रमांक 23/2 या शेती क्षेत्रात गु्रांचा गोठा असून याठिकाणी दोन बैल, चार म्हशी, तीन म्हशिंचे वासरू याठिकाणी होते. ता. ८ रोजी गु्रांचे मालक रामकृष्ण पाटील यांनी त्यादिवशी रात्री ११ वाजता गुरांना चारा पाणी करून घरी गेले. मात्र सकाळी (पहाटे ) ५ वाजता शेतात आले असता दोन म्हशीचे वासरू (साडे तीन वर्ष वय )असलेले सकाळी दिसून आले नाही. रामकृष्ण पाटील यांनी इतरत्र शोध घेतला असता दिसून आले नाही. मात्र त्याठिकाणी एका वासरूचा दोर सोडून घेऊन गेले आहेत तर एकाचा दोर सुटला नसल्याने कापून टाकलेला दिसला. अंदाजे वीस हजार रुपये किमतीच्या वासरे चोरीला गेल्याने आज ता. १० रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत रामकृष्ण पाटील यांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस हे. कॉ. सुनील पाटील हे करीत आहेत.

