कळमसरेतील सुनेने मिळविला विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान!
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत दोन गोल्ड मेडलने सन्मानित
प्रा. हिरालाल पाटील
कळमसरे ता. अमळनेर:-
येथील प्रगतीशील शेतकरी अरुण पांडुरंग चौधरी यांची सुन, हितेश अरुण चौधरी यांची पत्नी ऋतुजा चौधरी यांनी एम. एस्सी.वनस्पती शास्र या विषयात विद्यापीठात प्रथम व विद्यार्थीनीत सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविल्याने जळगाव येथे झालेल्या पदवीदान समारंभात सौ. ऋतुजा चौधरी यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते दोन गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविले गेले.
हितेश चौधरी व ऋतुजा चौधरी यांचा गेल्या मागील महिन्यातच विवाह झाला आहे. ऋतुजा चौधरी यांचे माहेर कजगावं येथील असून त्यांनी प्राथमिक, माध्यमिक शिक्षण कजगावं येथे तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण राष्ट्रीय जुनिअर कॉलेज चाळीसगाव येथे घेतले.चाळीसगावं मधील य. ना. चव्हाण महाविदयालय येथे बी. एस. स्सी यानंतर धुळे येथील एस. एस. व्ही. पी. एस महाविद्यालयात एम एस्सी वनस्पती शास्त्र या विषयात पूर्ण करून विद्यापिठात प्रथम व विद्यार्थिनीत सुद्धा प्रथम आल्याचा बहुमान मिळवीत राज्यपाल यांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला आहे. ऋतुजा चौधरी यांचे वडील भीमराव अर्जुन चौधरी कजगावं सारख्या ग्रामीण भागात राहून ते शेतकरी असूनही मुलीला उच्च शिक्षण दिले.
कळमसरे गावात पहिली महिला सुन पी. एच. डी.
सौ. ऋतुजा चौधरी ह्या एम. एस्सी ला असतानाच पी एच डी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांची पी. एच. डी नोंदणी झाली असून कळमसरे ता. अमळनेर गावाला प्रथम पी. एच. डी. धारक सुनेचा मान मिळणार असल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. तर शेतकरी वडिलांनी मुलीला उच्च शिक्षित करून नाव लौकिक मिळविले आहे. तर आता कळमसरे येथील ऋतूजा यांचे सासरे शेतकरी श्री. अरुण चौधरी हे ही सुनेच्या पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी कंबर कसली आहे. येथील हितेश चौधरी हे मुंबई येथे केमिस्ट कंपनीत नोकरीला असून पत्नी ऋतुजा यांना डॉ. प्रा. ऋतुजा हितेश चौधरी मान मिळवून आपणही त्यांच्या माहेरचा व सासरचा सन्मान मिळवून त्यांच्या खांदयाला खांदा लावित आम्ही दोघेही स्वप्न पूर्णत्वास नेऊ असे त्यांनी पत्नी ऋतुजा यांचा सन्मानाच्या दिवशी सांगितले. दरम्यान सौ. ऋतुजा यांना अभिनंदन करण्यासाठी नातेवाईक, गावातील सर्व समाजबांधवानीही कौतुक केले आहे.

