पिंपळी ता.अमळनेर येथे सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवानिमित्त रिश्ते या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..
अमळनेर :-
पिंपळी येथील ग्राम विकास मंडळ संचलित महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळी तर्फे नुकताच सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला..
संपूर्ण गावात दिवाळी सारखे दिव्यांची व आकाश कंदील लावून घरोघरी सावित्रीबाईंना वंदन करण्यात आले .
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात ` रिश्ते (नातं)`या आशयावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
पारिवारिक सांस्कृतिक नृत्य, ज्योतिबा आणि सावित्री, शिवाजी आणि जिजाऊ, भाऊ बहीण यांचे नाते, आई वडील आणि मुलगा मुलगी यावर आधारित नृत्यविष्कार, मित्रत्वाचे नाते,
बाप आणि त्यांची जीवन कहाणी यावर आधारित उत्कृष्ट सादरीकरण विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात केले. सदर कार्यक्रमाचा पालक ,ग्रामस्थ बंधू भगिनींनी मनमुराद आनंद घेतला आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करून दाद दिली.
याप्रसंगी उद्घाटन सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे साहेब,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अध्यक्ष ग्राम विकास मंडळ पिंपळी, सरपंच ग्रामपंचायत पिंपळी श्री.प्रेमराज चव्हाण, भूपेंद्र जिजाबराव बाविस्कर, श्री चंद्रकांत फुलचंद साळुंखे संदीप घोरपडे, भगवान एकनाथ पाटील सर श्री संदीप नाना महाजन,संतोष गजमल महाजन, श्री हिम्मत श्रावण चव्हाण,श्री जनार्दन मांगो शेलकर,डॉ जीवनलाल भिवसन जाधव, शिवराम शामराव चव्हाण, दीपचंद भिला पाटील,श्री सुधाकर रघुनाथ महाजन, सोमा भिका पाटील ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री विकास प्रभाकर शेलकर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री दिनेश मुरलीधर सावळे सर यांनी केले.

