एस टी बसच्या धडकेत दोधवद येथील दुचाकीस्वार वृद्ध जबर जखमी
अमळनेर :-
एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्ध जबर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील अमंळगाव रस्त्यावरील जळोद फाट्याजवळ ता.२८ रोजी घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी प्रवीण शालिग्राम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, त्यांचे वडील शालिग्राम मंसाराम पाटील (रा. दोधवद, वय ६५) हे ता.२८ रोजी दुपारी २ च्या सुमारास स्वतःच्या दुचाकीने अमळगाव कडे जात असताना जळोद फाट्याजवळ वळणावर समोरून येणाऱ्या एसटी बस (क्रमांक एमएच २० बीएल ०९३४) वरील चालकाने भरधाव वेगाने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे शालिग्राम पाटील यांच्या चेहऱ्याला, तोंडाला, हातापायाला व छातीला जबर दुखापत झाली. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हे.कॉ.सचिन निकम हे करीत आहेत.

