महसूल, पोलीस, आर. टी. वो यांची संयुक्त कारवाईनेच अवैध वाळू वाहतूकीला लगाम!
समन्वय नसल्याचे अवैध वाळूचे जाळे पसरले ?
अमळनेर :-
जिल्ह्यात सर्वत्र सध्या अवैध वाळू वाहतूक प्रकरण तापले आहे. मागील आठवड्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना आळा घालायला गेलेले महसूल कर्मचारी यांच्या जीवावर बेतले, थोडक्यात बचावले देखील मात्र अवैध वाळू वाहतुकीला आळा कोण घालेल असाही प्रश्न पडला असताना. प्रशासन हे या कारवाईला सामोरे जाण्यासाठी परिपूर्ण असताना देखील आज पर्यंत वाळू चोरी थांबवू शकले नाहीत. यामुळे कठोर कारवाईचा बडगा यांच्यावर होत नसल्याने नेहमीच जिल्ह्यात वाळू प्रकरण तापलेले दिसून येते.
जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात पांझरा व बोरी नदीत अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत असताना याला लगाम नसल्याने मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडत आहे. मात्र याला जबाबदार कोण असाही प्रश्न पडतो.
पांझरा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असताना सद्यस्थितीत अवैध वाळू चोरी करणारे जीवावर उठले आहेत. रात्रीची चोरट्या वाहतुकीने संधी साधीत शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात जातोय. मात्र या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना जेरबंद करण्यासाठी महसूल, पोलीस व आर टी ओ यांनी संयुक्त कार्यवाही करणे गरजेचे असताना स्वतंत्र कारवाई साठी जात असताना महसूल कर्मचारी यांच्या जीवावर बेतले जात असल्याच्या घटना घडताना दिसून येत आहेत. मात्र असे असताना देखील पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन संयुक्त कारवाई साठी एकत्र नसल्यानेच अवैध वाळू वाहतूक करणारे संधीचा फायदा घेत आहेत की, यांच्यात समन्वय नसल्याने चोरटी वाळू वाहतुकीला खतपाणी मिळतेय हेच समजू न शकल्याने जळगाव जिल्ह्यातच नाही तर अमळनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक नेहमीच समस्या राहिली आहे.
पांझरा काठावरील मुडी, मांडळ, बेटावद, भिलाली, शहापूर,तांदळी, पढावद या गावातील नदी किनारी रात्रीची चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते यावेळी कारवाई साठी गेलेले महसूल कर्मचारी यांच्या जीवावर बेतल्याने त्यांना मात्र भीतीने नेहमीच घाबरलेले असताना त्यांच्या जोडीला पोलीस प्रशासन, आर टी ओ यांनी संयुक्त कारवाई केल्यास अवैध वाळू वाहतुकीला लगाम नक्कीच बसेल………..
.
