विचारांचा प्रचार व प्रसारासाठी वेळ किंवा तिथी न बघता विचारांचा ज्योत तेवत ठेवा –
अमळनेर :-
ठेवण्यासाठी
भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने ता.६ डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आज ता. 22 रोजी रेस्ट हाऊस भडगाव येथे आज प्रबोधन सत्र आयोजित करण्यात आले होते. विचारांचा प्रचार व प्रसारासाठी वेळ किंवा तिथी न बघता विचारांचा ज्योत तेवत ठेवा या विचारांनी प्रेरित होत हा कार्यक्रम राबवीण्यात आला.यावेळी प्रमुख वक्ते मुकेश नेतकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट, त्यांचे दीन दलित यांच्यासाठी केलेले कार्य, ईव्हीएम मशीनचा गैरवापर करून लोकशाही कशी संपवली जात आहे. आणि आपण संघटित होऊन काय केले पाहिजे,यावर प्रबोधन केले याप्रसंगी विचार मंचावर वडजी येथील माजी सरपंच राजू सोनवणे,शंकर भराडी हरीभाऊ पाटील,चुडामन सोनवणे,रघुनाथ राठोड हे होते. जितेंद्र रायसिंग सर यांनी प्रस्तावना केली.प्रा. दिनेश तांदळे,.रवि चव्हाण, रवी पाटील, डि.के वाल्हे,प्रा.एल जी कांबळे, योजना ताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तर जाकीर कुरेशी यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी ज्ञानेश्वर मोरे वडजी यांनी एक हजार रुपये इतका जनांदोलन साठी निधी दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भगवान शिंदे,नाना सोनवणे, हेमंत पाटील,विनोद पगारे,योगीराज पाटील,करणं चव्हाण , राहुल निकम,आप्पा भिल, समाधान जोंधळे या सर्वांनी विशेष सहकार्य केले.

