सावधान अपघात होण्याची दाट शक्यता आहे ?
अमळनेर शहरात मुख्य मार्गांबरोबरच, कॉलनी भागात जाळ्यांची अवस्था खराब
भालेराव नगर मधील मुख्य रस्त्यावरही तीच अवस्था —
अमळनेर :-
येथील नगर पालिका हद्दीतील धुळे रस्त्यालगत भालेराव नगर मधील मुख्य रस्त्यावर जाळ्यांची अवस्था पूर्णता खराब झाली आहे.
येथील बस स्टॅन्ड ते चोपडा नाका दरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला दगडी दरवाज्या जवळ व विविध ठिकाणी भूमिगत गटारीवर लावलेल्या जाळ्यांची अवस्था बिकट झाली आहे.अमळनेर शहरात येणारी सर्व वाहतूक येथूनच होत असते. त्या जाळ्यांना असलेले लोखंड तुटल्याने दररोज दोन ते तीन नागरिकांचा अपघात होत आहे. शहरात मुख्य मार्गावर असे खड्डे पडलेले असून जाळ्या तुटलेल्या आहेत. गलथान कारभाराने मोठा अपघात होऊन शकतो.
नगरपालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्य घ्यावे. अन्यथा दुचाकी चालविणारे किंवा सायकलीने दररोज शाळेत जाणारे विदयार्थी यांचा या लोखंडी जाळ्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यामुळे शहरातील नागरिकांनी या समस्या बाबत बऱ्याचदा गांभीर्य घेऊन शांतता पाळावी असेही आवाहन करण्यात आले.

