डॉ. अमोघ जोशी यांना “राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार” २०२४ जाहीर
आज पुणे येथे पुरस्कार वितरण
अमळनेर :-
तालुक्यातील नामवंत हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. अविनाश जोशी यांचे चिरंजीव डॉ. अमोघ जोशी यांना महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त भारत सरकार सूक्ष्म लघु एव, मध्यम उद्योग मंत्रालय या विभागात नोंदणीकृत असलेल्या टॅलेंट कट्टा या संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात देण्यात येणारा यावर्षीचा “राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार” २०२४ पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. डॉ. अमोघ जोशी यांनी वैद्यकीय, संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व भरीव योगदान दिल्याबद्दल अत्यंत मानाचा समजला जाणारा “राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार” जाहीर झाला आहे.
पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती डॉ. दिपक जाधव यांच्या कडून निवड पत्राद्वारे देण्यात आली आहे. टॅलेंट कट्टा या संस्थेच्या निवड समितीने डॉ. अमोघ जोशी यांची निवड या पुरस्कारासाठी आहे. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त भारत सरकार सूक्ष्म लघु एव, मध्यम उद्योग मंत्रालय या विभागात नोंदणीकृत असलेल्या टॅलेंट कट्टा या संस्थेकडून महाराष्ट्र रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आयोजन पुणे येथे रविवार दि. २२ डिसेंबर, २०२४ रोजी करण्यात आले आहे. या सोहळ्यात साहित्य, कला, सामाजिक, क्रिडा, सांस्कृतिक, उद्योग, पर्यटन, अपंग निराधार महिला, वन्यजीव, व्यवसाय, शैक्षणिक, आरोग्य, सार्वजनिक सेवा, स्वायत्त संस्था, सहकार, पत्रकारिता, कृषी अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व राष्ट्रभक्तीने प्रेरित होवून समाजऋण फेडणा-या तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव व भान ठेवून कार्य करणा-या व्यक्तींचा या सोहळ्यात सुप्रसिध्द अभिनेत्री आर्या घारे, श्री. नितिन धवने – पाटील, श्री.शेखर गायकवाड सर (महाराष्ट्राचे साखर आयुक्त ) यांच्या व मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना ही पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
डॉ. अमोघ जोशी यांची वैद्यकीय, संगीत क्षेत्रातील कामगिरी पाहून टॅलेंट कट्टा या संस्थेच्या निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, मानचिन्ह, शाल, फेटा असे आहे. तसेच हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे निकटवर्तीय, नातेवाईक, ग्रामस्थ, व मित्र परिवार यांच्या कडून शुभेच्छा देण्यात येत आहेत व त्यांच्यावरती कौतुकांचा वर्षाव होत आहे .
डॉ. जोशी यांना पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती डॉ. दिपक जाधव यांच्याकडून देण्यात आली आहे.

