रणाईचे जिल्हा परिषदेच्या शाळेत बाल आनंद मेळावा —
अमळनेर :-
रणाईचे ता. अमळनेर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुभाष धरमदास राठोड यांच्या हस्ते प्रतिमापूजन होऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या बाल मेळाव्यात सँडविच, पाववडा, खाजापुरी, मंचुरियन, बर्फी, गुलाबजामून, पोंगे,बटाटे, खारे शेंगदाणे,चना मसाला, भेळ, चहा इत्यादी प्रकार प्रकारचे स्टॉल उभारले होते मुलांनी ग्रामस्थांनी तसेच शिक्षण प्रेमी युवक यांनी उत्साहात खरेदी केली व मुलांचा आनंद द्विगुणीत केला. या प्रसंगी सरपंच श्री प्रकाश चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री शिवदास पाटील, ग्राम पंचायत सदस्य हिरालाल पाटील,श्री हेमंत पाटील, श्री दिनकर राठोड, तसेच ग्रामस्थ मुख्याध्यापक सतीश ढोले, श्री शत्रुघ्न रोकडे, वैशाली पाटील,उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेंद्र पाटील यांनी तर आभार वैशाली पाटील यांनी मानले.

