रविंद्र उर्फ विश्वनाथ पितांबर पाटील यांची खोट्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता
सत्य परेशान है, पराजित नही
अमळनेर :-
येथील माजी नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील यांचे चिरंजीव रविंद्र उर्फ विश्वनाथ पितांबर पाटील 12 मे 2024 रोजी लोकसभा मतदानाच्या आदल्या दिवशी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.त्यांची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्ततता झाली आहे.
ता.12 मे 2024 रोजी, विद्या विहार कॉलनीच्या कमानी जवळ दारू पिऊन धिंगाणा घालत असलेल्या काही लोकांनी आपसात भांडण सुरू केले. त्या धिंगाण्यात भाग घेणाऱ्यांमध्ये सामंजस्य साधण्यासाठी रवि पाटील यांनी मध्यस्थी केली. पण त्यांची ही सदभावना मात्र त्यांच्या विरोधकांना मान्य नव्हते. त्यांनी रवी पाटील यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला.
दरम्यान ता.5 डिसेंबर 2024 रोजी न्यायाधीश एस.एस.जोंधळे प्रथम वर्ग न्यायालय अमळनेर यांनी रविंद्र उर्फ विश्वनाथ पितांबर पाटील यांची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयामुळे प्रभागातील नागरिक, महिलामंडळ, आणि मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी रवी पाटील यांनी आपली न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता.सत्य परेशान हो सकता है पराजीत नहीं.

