अमळनेर शहरात मोकाट जनवारांनी कोंडला श्वास!
मोकाट फिरणारे जनवरांचा बंदोबस्त करा
अमळनेर :-
येथील शहरात मुख्य बाजारपेठ, कॉलनी एरियात सर्वत्र मोकाट जनावरांचा त्रास वाढल्याने रस्त्याच्या मध्यभागी जनावरे उभे, आडवे येत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
शहरात सर्वत्र मोकाट फिरणारे जनावरांची संख्या वाढली आहे. यात गाय आणि बैल यांची संख्या जास्तीची असून हे पशु पालकांवर कारवाई करून नगरपालिका प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. मुख्य बाजार पेठेत गंगाघाट, भाजीपाला मार्केट, पाचपावली देवी मंदिर, सराफ बाजार, सुभाष चौक, महाराणा प्रताप चौक आदी ठिकाणी दहा ते पंधरा जनावरे रस्त्यात आडवे उभे असतात, वाहन धारकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भाजीपाला मार्केट, सराफ बाजार , गंगाघाट या भागात नेहमी गर्दी असल्याने पायी चालणारे व वाहनधारक यांना या जनावरांचा मोठया प्रमाणात त्रास होतो. रस्त्यातच आठ दहा जनावरे बसून जातात. तर काही वेळेस त्यांची झुंड अपघाताला आमंत्रण देते.
नगरपालिका प्रशासनाची डोळ्यावर पट्टी :-
नगरपालिका प्रशासनाला ही बाब काही नवीन नसताना याकडे मुद्दाम कानाडोळा केला जात असल्याचे म्हटले जात आहे. नगरपालिका हद्दीत रस्त्यावर अतिक्रमण करणारा किरकोळ विक्रेता चारचाकी वाहन धरून बसलेला नजरेस पडतो, मात्र बाजार पेठेत हैदोस घालणारे गुरे नजरेआड होतात. शहरातील बाजारपेठेत, कॉलनी भागात मोकाट जनावरे सोडणाऱ्या पशुपालक यांना सूचना देऊन या मोकाट फिरणाऱ्या गु्रांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरीत असून याकडे कानाडोळा करणारे जबाबदार यांनी कुंभकर्ण झोपेतून जागे होत कार्यवाही करून रस्त्यावरील जनता सुरक्षित करावी अशीही मागणी शहरवासियांनी केली आहे.

