साने गुरुजी विद्यालयात बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत शपथ
अमळनेर :-
बुधवारी साने गुरुजी विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी “एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन”,आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर”, यूनिसेफ एस.बी.सी थ्री द्वारा बालविवाह निर्मुलन ची शपथ घेण्यात आली. यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बालविवाह निर्मुलन बाबत पथनाट्य सादर करत जनजागृती केली.
राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सागर कोळी,अन्वर फकीर,कीर्ती सोनवणे,अनुजा पाटील,रत्ना खैरनार,मयुरी पाटील या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले यावेळी मुख्याध्यापक संजीव पाटील, उपमुख्याध्यापक योगेश मोरे ,प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर ,दिपक विश्वेश्वर, यूनिसेफ एस.बी.सी थ्री जिल्हा प्रकल्प समन्वयक रुचिका इंगळे, व संरक्षण अधिकारी योगिता चौधरी,क्षेत्र समन्वयक प्रा.डॉ.जगदीश सोनवणे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.

