गीता जयंतीच्या पाश्वभूमीवर देशात ४५ लाख श्रीमद भगवद गीता घरा-घरात पोहचविण्याचा संकल्प —
अमळनेर :-
गीता जयंती निमित्ताने प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संपूर्ण भारत देशात दरवर्षी डिसेंबर महिन्यात गीता मॅरेथॊनचे आयोजन करण्यात येते. या वर्षीही गीता जयंतीच्या पाश्वभूमीवर देशात ४५ लाख ” श्रीमद भगवद गीता” घरा-घरात पोहचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी सर्वत्र देशाभरात इस्कॉन टीमने गीता घरा-घरात पोहचविण्याचे काम सुरु आहे. मुंबई येथील टीम नाशिक, मालेगाव, शिरपूर, चोपडा व आज ता. 10 रोजी अमळनेर येथे महाराणा प्रताप चौकात श्रीकृष्ण गोविंदास, गुणदयामय दास, कौशल्या पुत्र दास, भक्त अक्षय, भक्त आकाश, भक्त सूरज, भक्त प्रेम यांची टीम आलेली आहे. यावेळी त्यांनी या डिसेंबर महिन्यात गीता मॅरेथॉन मध्ये डिसेंबर या महिन्यात देशात ४५ लाख गीता घरा-घरात पोहचविण्याचा मानस असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

