कळमसरे येथे श्री दत्त जयंती निमित्तान संगीतमय भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहास सुरुवात –
भव्य शोभा यात्रेने कथेला सुरुवात
अमळनेर :-
कळमसरे ता. अमळनेर येथे ता. 8 डिसेंबर २०२४ पासून ते बुधवार ता.15 डिसेंबर २०२४ पर्यंत संगीतमय भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाला सुरुवात झाली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात गावातील नवसाचा गणपती मंदिर पासून भागवत कथेचे भव्यदिव्य अशी शोभायात्रा ने झाली. याप्रसंगी
संगीतमय भागवत कथेचे निरूपण प.पू.कृष्णदास महाराज नांदेडकर (राममंदिर) यांची महादेव नगर येथील नवसाचा गणपती या मंदिरापासून बस स्टॉप, श्रीराम मंदिर, महाराणा प्रताप चौक दत्त मंदिरा भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी कलशधारी मुली, महिला, संगीतमय वातावरणात भक्तांनी ठेका धरला होता. दुपारी कथा निरूपणाला सुरुवात झाली असून ,सायंकाळी हरिपाठ,भारुड व रात्री कीर्तन असे कार्यक्रम सुरु झाले आहेत.काल (ता.8) ह.भ.प अतुल महाराज नारणेकर यांचे रात्री कीर्तन श्रवणाचा कार्यक्रम झाला.
पंचक्रोशीतील समस्त भाविक भक्तांनी उपस्थित राहून ज्ञानदानाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती समस्त दत्त मंदिर ट्रस्टी व ग्रामस्थ कळमसरे यांनी केली आहे.

