डॉ. डिगंबर महाले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
अमळनेर : नेहमी नाविण्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवून समाजकार्यात वेगळी ओळख निर्माण करणारे मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ डिगंबर महाले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मंगळग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून डॉ. डिगंबर महाले यांनी धार्मिकताच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात नाविण्यपूर्ण सामजिक उपक्रम राबवून एक आगळावेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या याच सामाजिक कार्यातून प्रेरित होऊन अमळनेर येथे डॉ. डिगंबर महाले यांच्या वाढदिवशी पिंपळे रोडवरील आदिवासी समाज वस्तीतील लहान बालकांना थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून कानटोपींचे वाटप केले. तसेच गलवाडे रोडवरील ममता विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना जिलेबीसह मिष्टांन्न दिले. यावेळी विद्यालयाचे शिक्षकवृद उपस्थित होते.

