पुजाने अनैतिक संबंधापायी सुखी संसाराची केली राख रांगोळी!
पित्याच्या खुनाने अन आईच्या तुरुंगवासाने मुलांचे भविष्य अंधारात!
दोघे आरोपीना पाच दिवसाची पोलीस कोठडी
अमळनेर :-“पतीला दीर्घायुष्य व सात जन्म लाभावे म्हणून वटपौर्णिमेचा उपवास करणारी स्त्री, आपल्या वाईट काळातही पतीला साथ देणारी स्त्री, असाच भारतीय स्त्रीचा सर्वत्र उल्लेख केला जातो. आणि पती धर्माला स्त्री जागतेही,मात्र याला अपवाद काल ता. 6 रोजी प्रेम संबंधात बाधा ठरणाऱ्या पतीला कायमचे संपविणारी पुजाने पती तुषारला प्रियकराच्या मदतीने संपविले.”
दरम्यान पती तुषारच्या अंत्यविधी नंतर पोलिसांनी अटक केली असून सागर व पूजाला पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मारवड ता. अमळनेर येथील रहिवासी हल्ली प्रताप मिल कंपाउंड येथे राहत असलेले तुषार चिंधु चौधरी याचा खून दोंडाईचा मालपूर येथील सागर बापू चौधरी याने केल्याने मयत तुषारची पत्नी पूजा आणि सागर यांच्यात लग्नापूर्वी प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. सागर बापू चौधरी आणि पूजा चौधरी यांच्यात लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते.सागर अनेकदा अमळनेर येथे येऊन तो पुजाला घेऊन बाहेर जातही होता. सागर याला एक मुलगी असून त्याची पत्नी माहेरी निघून गेल्याने त्याने पूजाशी लग्न करायची इच्छा व्यक्त केली. पूजाने देखील त्याच्या सोबत जाण्याची तयारी दर्शवली होती. सागरने तुषार चा काटा काढण्याचा निर्णय घेतला. पूजा तुषारला मारू नको असे सांगत होती. मात्र अडथळा कायमचा दूर करण्याचा निर्णय सागर ने घेतला होता. पूजाने सागरला बोलावून घेतले होते. पती तुषार याला सांगितले की माझा नातेवाईक येत आहे तुम्ही त्याच्या सोबत पत्रिका वाटायला जा. सागर आल्यावर त्याने तुषार ला सोबत घेतले आणि दारू प्यायला घेऊन जात त्याच्या डोक्यात दगड टाकून खून केला.
या सर्व घटनेने अमळनेर तालुक्यासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मयत तुषार चौधरी हा घरातील एकटा कर्ता पुरुष पत्नी पुजा, विधवा आई रंजनाबाई , एक मुलगी, एक मुलगा असा सुखी संसार सुरु असताना पुजाच्या अनैतिक संबंधाच्या अट्टाहासा पायी आणि सागर सारख्या व्यसनाधीन तरुणाशी प्रेम संबंध ठेऊन आज पुजा पूर्णता उध्वस्त झाली आहे.
पुजाच्या घरात सर्व सुख सोयी उपलब्ध असताना सागर सारख्या आतमुठ्या “नराधमा”सोबत आपले प्रेम प्रकरण कायम ठेवून कपाळावरच्या कुंकूला कायमचे पुसले. यामुळे पूजाबद्दल जन-मानसात प्रचंड चीड व राग व्यक्त होत आहे. तीने आपल्या कुंकूवाचा विचार केला नाही अन दोन मुलांचा तर इतरांचा काय विचार करेल असाही सुर उमटत आहे. तीने केलेल्या या कृत्यामुळे सुखाला लाथाळलेली अभागी स्त्री म्हणावी लागेल.आज यामुळे एक मुलगी पाच वर्षाची,एक मुलगा दोन वर्षाचा हे आज निराधार झाले आहेत.त्यांचे पुढील भविष्य आजच आई -वडील नसल्याने अंधारात दिसत असून त्या मुलांना पाहून प्रत्येकाचे मन शोक व्यक्त करीत आहे.

