कळमसरे येथे श्री दत्त जयंती निमित्तान संगीतमय भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह चे आयोजन
अमळनेर :-
कळमसरे ता. अमळनेर येथे सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा भगवंत कृपेने व संतांच्या आशीर्वादाने बुधवार ता. 8 डिसेंबर २०२४ पासून ते बुधवार ता.15 डिसेंबर २०२४ पर्यंत संगीतमय भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात गावातील नवसाचा गणपती मंदिर पासून भागवत कथेचे भव्यदिव्य अशी शोभायात्रा ने होईल.
संगीतमय भागवत कथेचे निरूपण प.पू.कृष्णदास महाराज नांदेडकर (राममंदिर) यांच्या अमृतवाणीतून होणार आहे.
दैनदिंन कार्यक्रमात पहाटे काकडा आरती, दुपारी कथा निरूपण,सायंकाळी हरिपाठ,भारुड व रात्री कीर्तन असे कार्यक्रम होतील.
रविवार (ता.8) ह.भ.प अतुल महाराज नारणेकर, सोमवार(ता.9) ह.भ.प भानुदास महाराज भुसावळकर, मंगळवार (ता.10) ह.भ.प पंकज महाराज पवार अमरावतीकर , बुधवार (ता.11) ह.भ.प अमोल महाराज घुगे अकोला,गुरूवार (ता.12)* ह.भ. लक्ष्मण शास्त्री महाराज खेडी भोकर शुक्रवार (ता.13) ह.भ.प पंकज देशमुख महाराज हिंगोली.
ह भ.प चकोर महाराज शास्त्री अकोट शनिवार (ता.14) रोजी तर रविवार (ता.15) रोजी ह भ प किशोर महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तन होईल
तरी पंचक्रोशीतील समस्थ भाविक भक्तांनी उपस्थित राहून ज्ञानदानाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती समस्त दत्त मंदिर ट्रस्टी व ग्रामस्थ कळमसरे यांनी केली आहे.

