खरीप हंगाम 2024-25 शेतक-यांनी उत्पादीत शेतमालाला किमान आधारभूत भाव द्या –
शेतक-यांना न्याय न दिल्यास शेतक-यांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची रक्कम व्याजासकट शेतक-यांना अदा करण्याच्या सूचना :-
अमळनेर :-
सन 2024-25 या आर्थिक वर्षाच्या खरीप हंगामात अमळनेर तालुक्यातील शेतक-यांनी उत्पादीत केलेला कापूस, मका, ज्वारी, सोयाबीन, तूर या शेतमालाचे किमान आधारभूत दरान्वये शेतमाल खरेदी/ मोजणी केंद्र ता.15 डिसेंबर 2024 पासून पुढे अमळनेर तालुक्यात नियमित व अखंडीतपणे सुरु करुन शेतक-यांना न्याय दयावा. त्यांना योग्य भाव व न्याय न देण्यात आल्यास शेतक-यांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची रक्कम शेतमाल विक्री तारखेपासून 16% (सोळा टक्के) व्याजासकट शेतक-यांना अदा करणेच्या कार्यवाहीची पूर्तता करावी अश्या आशयाचे निवेदन संस्थापक अध्यक्ष गावरानी जागल्या सेनेचे प्रा.विश्वासराव पाटील यांनी प्रांतधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांना दिले होते.
प्रांतधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना या निवेदनाचा खुलासा देण्यात आला आहे.गावरान जागल्या सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वासराव पाटील हे नेहमी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची तळमळ असल्याने शेतकरी बांधवानी त्यांचे आभार मानले आहेत.

