प्रहार जनशक्ती पक्षाचा शिरीषदादा चौधरी यांना पाठिंबा
अमळनेर :-
विधानसभा निवडणुकीसाठी २०२४ मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने आपला अधिकृत पाठिंबा अपक्ष उमेदवार शिरीष हिरालाल चौधरी यांना जाहीर केला आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रदीप किरण पाटील यांचा उमेदवारी अर्ज त्रुटीमुळे फेटाळल्याने, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आणि लोकनेते बच्चूभाऊ कडू व छत्रपती संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकारी मंडळाने अमळनेर तालुक्यातील युवक तालुका प्रमुख रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली व शेतकरी आघाडी, युवक आघाडी, आणि अन्य घटकांच्या प्रमुखांच्या सल्ल्यानुसार एकमताने शिरीषदादा चौधरी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
यावेळी शेतकरी संघटना, जनशक्ती पक्ष, आणि अपंग क्रांती संघटना या सर्व प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या अंगीकृत संघटनांनीही शिरीषदादा चौधरी यांना पाठींबा दिला. या महत्त्वपूर्ण वेळी शेतकरी संघटनेचे प्रदीप बोरसे,राजेंद्र पाटील, शिवाजी पाटील, जनशक्ती पक्षाचे रवींद्र पाटील, प्रमोद पाटील, प्रदीप गोसावी, विपुल पाटील, भिकन पाटील, फारुख शेख, तसेच अपंग क्रांती संघटनेचे योगेश पवार, अशोक ठाकरे, साहेबराव महाजन, हमीद खाटीक, मधुकर पाटील, योगेश पाटील, रंजू जैन हे मान्यवर उपस्थित होते.
पाठिंब्याची अधिकृत घोषणा सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या पाठिंब्यामुळे शिरीषदादा चौधरी यांना मतदारसंघात प्रचंड लोकसमर्थन मिळण्याची अपेक्षा आहे.
शिरीषदादा चौधरी यांचे नेतृत्व व कामाच्या प्रतिमेमुळे अमळनेर मतदारसंघातील सर्व समाज घटकांमधून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. शेतकरी, युवक, आणि महिलांच्या समस्यांवर केंद्रित असलेल्या त्यांच्या योजना, त्यांना यशस्वी उमेदवार म्हणून उभं करतील अशी अपेक्षा प्रहार पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

