अमळनेर तालुक्यात एकाला चिकून गुनियाची झाली लागन
अमळनेर :-
तालुक्यातील एकाला रुग्णाला चिकुन गुनियाची लागन झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
तालुक्यातील एका नागरिकाचे अचानक पाय सुजले. त्याला उठणे आणि चालणेही कठीण झाले. त्याला उपचारासाठी धुळे येथील हाडांचे डॉक्टर सैंदाणे यांच्याकडे नेले असता त्यांनी चिकुन गुनिया झाला असल्याचे सांगितले. रुग्णाला अमळनेर येथे डॉ. निखिल बहुगुणे यांच्याकडे दाखल केले असता त्यांनी उपचार केल्याने रुग्ण चालू लागला. डॉ बहुगुणे यांनी लक्षणे चिकुन गुनिया सारखे असल्याचे सांगितले. डासांमुळे चिकुन गुनिया पसरत असतो म्हणून नागरिकांनी आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. हा आजार पसरू नये म्हणून पालिका व ग्रामपंचायतींकडून डासांची फवारणी केली पाहिजे अशीही मागणी होत आहे. मेहरगावं ता. अमळनेर येथील सुरेश पाटील यांचेही पाय अचानक सुजल्याने पायात वेदना होऊ लागल्या, त्यांनी डॉक्टरांना दाखविले असता चिकन गुनिया झाले असल्याचे सांगितले.

