अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक गंभीर जखमी
अमळनेर : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने धुळे तालुक्यातील कालिका शिरूड येथील ज्ञानेश्वर चौधरी नामक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना ११ रोजी रात्री दहिवद फाट्यावर घडली.
ज्ञानेश्वर चौधरी हा मोटरसायकल (एम एच १८ सीबी २८२४) वर जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटरसायकलसह खाली पडल्याने त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. तो बेशुद्ध पडला होता. त्याचा श्वास चालू असल्याने त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डॉ आशिष पाटील यांनी प्राथमिक उपचार करून त्याला धुळे येथे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
