डॉ.अनिल शिंदेंना मोठया मतांनी विजयी करा,पारोळा येथील सभेत शरदचंद्रजी पवार यांचे भावनिक आवाहन…
अमळनेर :-
आज ता. 11 रोजी पारोळा येथे माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शरदचंद्र पवार यांनी महाविकास आघाडीचे अमळनेर विधान सभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांची निशाणी हाताचा पंजा आहे. डॉ अनिल शिंदे यांना मोठ्या मतांनी विजयी करा असे आवाहन केले.शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाराष्ट्र राज्यात नऊशे शेतकरी आत्महत्या झाली आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या का करतो ? तरूणांना नोकऱ्या नाहीत, बेरोजगारी वाढलेली आहे.असा सवाल शरदचंद्रजी पवार यांनी उपस्थित केला,या देशात महिलांवर अत्याचार केला जातो.लहान मुलींवर अत्याचार केले जातात.शेतकरी कर्ज बाजारी आहे अशी अवस्था आपल्या महाराष्ट्राची झालेली आहे. महाविकास आघाडी याबाबत नक्कीच बदल घडवून आणेल. यासाठी जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवारांना बहुमताने निवडून सर्व सामान्य माणसाचा हक्क मिळविण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करु या.
शरदचंद्र पवार म्हणाले अमळनेर मतदारसंघात डॉ. अनिल शिंदेसारखे चांगले नेतृत्व आहे. वैद्यकीय क्षेत्रात नामवंत व उच्चशिक्षित आहेत, अतिशय साधा भोळा माणूस आहे. अमळनेकरांनी मोठ्या मतांनी डॉ.अनिल शिंदे यांना विजय करा अशी भावनिक सादही घातली यावेळी डॉ.शिंदे यांनी शरदचंद्र पवार यांच्या पाया पडतांना भावनिक होत आशीर्वाद घेतले.
दरम्यान डॉ. अनिल शिंदे यांनी मतदारांच्या भेटी घेत प्रचारात त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

