शहरातील वॉर्ड तेरा मधील नीलेश (बाबू )साळुंखे यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष
अमळनेर :- येथील शहरातील वॉर्ड नं 13 मध्ये नगरपालिका, विधान सभा, लोकसभा आदी निवडणूकींचे झुकते माप कुणाकडे असते,यासाठी नेहमीच लक्ष लागून राहिलेला या वॉर्डातील सामाजिक कार्यकर्ते नीलेश (बाबू )साळूंखे हे या विधानसभा मतदार संघात काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे
सध्या विधानसभा निवडणूकीत तिरंगी लढत असल्याने निवडणूक चूरशीची झाली आहे. यासाठी अमळनेर शहरात तीन बलाढ्य उमेदवार असेलेले महायुतीचे विद्यमान आमदार तथा मंत्री अनिल भाईदास पाटील, महाविकास आघाडीचे डॉ. अनिल शिंदे, अपक्ष उमेदवार माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यात तिरंगी लढत असल्याने निवडणूकीचा सामना चूरशीचा झाला आहे. सध्या शहरातील प्रत्येक वॉर्डातील माजी नगरसेवक यांचे झुकते माप कुणाकडे आहे. अमळनेर शहरातील मतदारांवरच विधान सभा मतदार संघातील भावी आमदारांचे लक्ष लागून आहे. वार्ड तेरा मधील सामाजिक कार्यकर्ते नीलेश (बाबू) साळुंखे यांच्या मातोश्री माजी नगरसेविका चंद्रकला अशोक पाटील या मागील पंचवार्षिक काळात नगरसेविका होत्या. नीलेश साळुंखे यांनी आपल्या वार्डमध्ये चांगले विकासकामे केली आहेत. नीलेश (बाबू )साळुंखे हे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांचा जनसंपर्क सर्वत्र असल्याने त्यांच्याभूमिकेकडे लक्ष लागून आहे.याच वॉर्डातून सध्यस्थीतीत दोन उमेदवार विधानसभेसाठी उमेदवारी करीत आहेत. यात महायुतीचे अनिल भाईदास पाटील, महाविकास आघाडीचे डॉ. अनिल शिंदे यांची उमेदवारी आहे. याच वॉर्डात खासदार स्मिता वाघ यांचेही निवासस्थान आहे. तर माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा जिजामाता पुष्पलता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील याच वॉर्डात आहेत.
शहरातील राजकीय समीकरणातील मातब्बर राजकीय आखाड्यातील पुढऱ्यांचा वॉर्ड म्हणुन ओळखला जाणारा याच वॉर्डातील नीलेश (बाबू )साळुंखे यांचाही जनसंपर्क मोठा असल्याने त्यांची भूमिका काय असेल याकडे लक्ष लागून आहे.

