आमचं ठरलंय कोरोना काळातील देवदूतालाच आमदार करायचं
डॉ. अनिल शिंदे यांना ग्रामीण जनतेतून मिळतोय प्रतिसाद :-
प्रा. हिरालाल पाटील
अमळनेर :-
कोरोना काळात जीव मुठीत धरून प्रत्येकजण बसले असताना सर्वत्र परिस्थिती बिकट झाली होती. गेल्या तीस वर्षापासून वैद्यकीय सेवेत तालुक्याला चोवीस तास सेवा देणारे डॉ. अनिल शिंदे यांनाच आमदार करायचं.. आमचं ठरलंय असेही म्हटले जात आहे. अमळनेरच नव्हे तर जिल्ह्यात उत्कृष्ट सर्जन म्हूणन ख्याती मिळवलेले डॉ. अनिल शिंदे यांनी कोरोना काळात बिकट परिस्थितीत रुग्णांना जीवदान दिले आहे. दवाखान्यात त्याप्रसंगी प्रत्येक रुग्णाला त्यांनी जीवदान देत या महामारीत नातेवाईक जवळ येत नसताना डॉ. अनिल शिंदे, डॉ. संदीप जोशी व त्यांच्या टीमने पूर्णवेळ सेवा दिली हे तालुक्यातील जनता -जनार्दन विसरलेली नाही.
कुठलीही शस्रक्रिया असली ती माफक दरात सेवा देऊन बऱ्याच रुग्णांना जीवदान देण्याचे मोठे काम डॉ. शिंदे यांनी केले आहे. आणि आजही करीत आहेत.
जिल्ह्यातील दवाखान्यात हवी तशी रुग्णसेवा मिळणार नाही ती अगदी माफक दरात त्यांनी उपलब्ध करून देत अवघडातील -अवघड शस्रक्रिया डॉ. शिंदे यांनी करून रुग्ण आज त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी डॉ. शिंदेच आमचे आमदार, आमचं ठरलंय एकच फॅक्टर शिंदे डॉक्टर असे म्हणत ग्रामीण भागात प्रचाराला गेलेले डॉक्टरांचे गावात महिला बघिणी औक्षण करीत शुभेच्छा देत आहेत.
आमच्या आरोग्यदूतालाच आता आमदार करीत विधानसभेत पाठवायचे असा मानसच जनेतेने केला आहे. प्रत्येक गावातील चौकात ” एकच फॅक्टर शिंदे डॉक्टर ” , “साधा माणुस, आपला माणूस “चा नारा सुरु आहे. सर्वसामान्य जनतेला आरोग्यासाठी अत्यल्प सेवेत संकट काळात धावून जाणारा डॉ. शिंदे यांना आमदार म्हणून पसंती मिळत असल्याचे म्हटले जात असून अमळनेर शहरात चोवीस तास वैद्यकीय सेवा देणारे डॉ. अनिल शिंदे यांना सर्वत्र पसंती मिळत आहे.

