शिरीष चौधरी भाजप मधून निलंबित ….
अमळनेर :-
पक्ष विरोधी कारवाया आणि वर्तन बघता शिरीष चोधरी यांना भारतीय जनता पार्टी तुन निलंबित करण्यात आले आहे. पक्षाच्या मुख्यालय मधून जारी केलेल्या पत्रकातून ही माहिती देण्यात आली आहे. अमळनेर मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून शिरीष चोधरी यांनी सहभाग घेतला आहे. भाजपचा आपल्याला छुपा पाठिंबा आहे असे भासविले जात होते. त्याची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. कार्यकर्त्यांना ही कठोर कारवाई चा इशारा देण्यात आला आहे. राज्यात भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती आहे. अमळनेर विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील आहेत. मात्र मागील पंचवार्षिक काळात शिरीष चौधरी यांनी भाजपा कडून उमेदवारी घेतली होती. ते आता अपक्ष उमेदवारी केली आहे.

