अमळनेर येथील गजानन भक्तांची पायीवारी निघाली शेगांवला!
अमळनेर :- दादासाहेब जी.एम. सोनारनगर येथील गजानन महाराज मंदिराची पायी वारी शेगांवला आज ता. 6 रोजी सकाळी सात वाजेला निघाली.गेल्या बारा वर्षापासून शेगाव येथे गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी पायी वारीचे आयोजन करण्यात येते.आज ता. 6 नोव्हेंबर रोजी पायी वारी सकाळी सहा वाजता निघण्यापूर्वी गजानन महाराज यांच्या मूर्तीचा पुरोहित अशोक भावे, नितीन भावे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. साडे सहा वाजता महाआरती होऊन सात वाजता पायी वारीला सुरुवात झाली. यावेळी मंदिरापासून ते विद्या विहार कॉलनीत पर्यंत अंगणात सडा-रांगोळी टाकून प्रत्येक घरातील महिला बघिणीनी पालखीची आरती करीत स्वागत केले. यावेळी संगीतमय वातावरणात निघालेल्या पायी वारीत सुमारे दोनशे भाविक सहभागी झाले आहेत. याप्रसंगी महिला भाविकांनी भक्तिमय गीतांवर ठेका धरला,विद्या विहार कॉलनीत सामाजिक कार्यकर्ते रवि पाटील यांनी फटाक्याच्या आतिषबाजी करीत सर्व पायी वारीला जाणारे गजानन भक्त यांचे स्वागत त्यांनी केले.
या पायीवारीत ता. 6 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर असे सहा दिवसांचा प्रवास असल्याने या प्रवासात सकाळी चहा, नास्ता, दुपारी जेवण,चहा,रात्रीचे जेवण प्रवासात मुक्कामाची व्यवस्था केली असल्याचे पायी वारी प्रमुख व गजानन महाराज मंदिराचे प्रमुख प्रा. आर. बी पवार सर यांनी सांगितले.
याप्रसंगी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गजानन ग्रुप करणखेडा, साई सेवा हॉस्पिटल चे डॉ. प्रशांत शिंदे यांनी केली आहे. भक्ताना औषधी पुरवठा मेडिकल असोसिएशन यांच्याकडून केला जाणार आहे.खेडी येथील नीलेश पाटील यांच्याकडून पायी वारीत ट्रॅक्टर सेवा दिली आहे.

