अमळनेर मतदार संघात बारा उमेदवार रिंगणात
चिन्ह वाटप,तीन उमेदवार पक्षांतर्गत तर नऊ अपक्ष
प्रांतधिकारी नितीन मुंडावरे यांची पत्रकार परिषद
अमळनेर :–
अमळनेर विधान सभा मतदार संघात आज ता. 4 रोजी माघारी नंतर चित्र स्पष्ट झाले असून बारा उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एकूण सोळा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात आज चार जणांनी माघार घेतली आहे.आता बारा उमेदवार रिंगणात असून त्यात तीन उमेदवार पक्षांतर्गत तर नऊ अपक्ष उमेदवार आहेत. यात उमेदवार नावे व चिन्ह डॉ.अनिल नथु शिंदे (पंजा ),अनिल भाईदास पाटील (घड्याळ ),सचिन अशोक बाविस्कर (हत्ती ),अपक्ष म्हणून अनिल भाईदास पाटील (केक ),अमोल रमेश पाटील(ग्रामोफोन), छबिलाल लालचंद भिल (दूरदर्शन ),निंबा धुडकू पाटील ( किटली ),प्रतिभा रवींद्र पाटील (कुकर ),यशवंत उदयसिंग मालची (विजेचा खांब ),रतन भानू भिल (शिट्टी),शिरीष हिरालाल चौधरी (बॅट),
शिवाजी दौलत पाटील (ऑटो रिक्षा )
असे एकूण बारा उमेदवार आहेत.
*माघार घेतलेली उमेदवारांचे नाव*- 1)कैलास दयाराम पाटील (के.डी .बापु ),2)अशोक लोटन पवार सर,3)जयश्री अनिल पाटील,
4) प्रथमेश शिरीष चौधरी
उद्यापासून प्रचाराला जोर येणार असून निवडणूक रिंगणात उमेदवारांना चांगलाच कस लागणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत अमळनेर विधानसभा मतदार संघात एकूण 12 उमेदवार असून मतदान अधिकारी यांचे पहिले प्रशिक्षण 26 ऑकटोबर रोजी झाले असून पुढील प्रशिक्षण 11 नोव्हेंबर रोजी होईल. ज्या तालुक्यात मतदान अधिकारी यांच्या ड्युटी असेल त्या ठिकाणी पुढच्या 11 तारखेला प्रशिक्षण घेतले जाईल असेही यावेळी प्रांतधिकारी यांनी सांगितले.
मतदान जागृती वर भर-
मतदान करा असे आवाहन न करता ज्याठिकाणी अगदी कमी मतदान होते. त्याठिकाणी कुठल्याही दबावात न येता मतदान करा.असेही आवाहन करण्यात येऊन जनजागृती करण्यात येणार आहे.

