वसंतनगर येथे फटाक्याच्या आतीषबाजीत डॉ. अनिल शिंदे यांचे जोरदार स्वागत :-
डॉ. अनिल शिंदे यांना समर्थन करीत बहुमताने निवडून आणण्याचा केला निर्धार
अमळनेर :-
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांनी आपल्या समर्थकांसोबत आज ता. 3 रोजी सकाळी प्रचार दौरा करीत वसंतनगर ता. पारोळा येथील ग्रामस्थांनी फटाक्याच्या आतीषबाजीत डॉ. अनिल शिंदे यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी वसंतनगर येथील बस स्टॉपवर डॉ. अनिल शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी आगमन करताच येथील ग्रामस्थांनी फटाक्याच्या आतिषबाजी करीत डॉ. अनिल शिंदे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है असा नारा लावत जोरदार स्वागत केले. यावेळी वसंतनगर गावातील बंजारा समाज बांधवानी डॉ अनिल शिंदे यांना समर्थन देत बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला.

गावात प्रचार रॅली निघाली त्यावेळी त्यांचे चौका-चौकात स्वागत करून महिला -बघिणीनी औक्षण करीत आशीर्वादही दिला असून यावेळी बंजारा समाज बांधव महाविकास आघाडीच्या पाठीशी असून डॉ. अनिल शिंदे यांच्या पाठीशी आहोत अशाही भावना व्यक्त केल्या.
आजच्या प्रचार दौऱ्यात डॉ. अनिल शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर, बेरोजगारीच्या समस्यानां आणि हमीभावाच्या अभावाबद्दल चर्चा केली.
डॉ. अनिल शिंदे यांनी आज वसंतनगर, भोलाणे, जामदा, सबगव्हाण बु, दळवेल, पिंपळभैरव, हिवरखेडा बु, हिवरखेडा तांडा, आंबापिंप्री, वडगाव, गावांमध्ये मतदारांशी संवाद साधला. या उपस्थितीत महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

