अमळनेर येथील अमलेश्वरनगरमधील तरुणाचा खून
अमळनेर :–
कट मारल्याच्या वादातून एकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना ता.३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास जळोद अमळगाव शिवारात घडली.
विकास प्रवीण पाटील वय ३० राहणार अमलेश्वर नगर हा आपल्या मित्रांसह पिंगळवाडे येथे तमाशा पाहण्यासाठी गेला होता. मोटरसायकलला कट मारल्यावरून इंडिकेटर तुटले. त्यावरून दोन्ही गटात अमळगाव जळोद रस्त्यावर हाणामारी झाली. या हाणामारीत विकास याचा मृत्यू झाला. ही घटना ता.३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. घटनेचे वृत्त कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील , संजय पाटील यांनी भेट दिली. विकास याचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. आरोपी फरार झाले असून मारवड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

