सहा वर्षांनंतर १ नोव्हेंबर पासून अमळनेरात चित्रपटगृह सुरू होणार
अमळनेर : – सहा वर्षानंतर अमळनेर शहरात पुन्हा चित्रपट दिसणार आहेत. आता मात्र चित्रपट गृहाऐवजी मल्टिप्लेक्स मध्ये प्रेक्षकांना आनन्द मिळणार आहे.
अमळनेर शहरात तंबोली , लक्ष्मी आणि अजंता अशा तीन टॉकीज होत्या. हळूहळू दोन टॉकीज बंद पडल्यानन्तर एकमेव तंबोली टॉकीज सुरू होती. ती जागा शहरातील प्रसिद्ध उद्योगपती सरजू गोकलाणी यांनी ती जागा विकसित करण्यासाठी घेतली. त्याठिकाणी हॉटेल व्यापारी संकुल उभारण्यात येणार होते. मात्र अमळनेरात करमणुकीचे साधंन असलेले चित्रपटगृह पुन्हा उभारण्याचा मानस व्यक्त करून ५ फेब्रुवारी २०१९ रोजी बाळासाहेब ठाकरेंच्या चित्रपटाचा अखेरचा शो ठेवण्यात आला होता. आता पाच वर्षे आठ महिने सव्वीस दिवसानंतर १ नोव्हेंबर २०२४ रोजी मिडटाऊन मध्ये एस एस सेनीप्लेक्स नावाच्या दोन मल्टिप्लेक्स मध्ये सिंगम अगेन* आणि *भुलभुलैय्या 3 हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. चित्रपट प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. सरजू गोकलाणी यांच्यामुळे अमळनेरातील रसिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. एका मल्टिप्लेक्स मध्ये १४८ प्रेक्षकांची बैठक व्यवस्था आहे. संपूर्ण बैठक व्यवस्था वातानुकूलित असल्याने चित्रपट पाहण्यास आनन्द मिळणार आहे. लवकरच ऑनलायीन बुकिंग सुद्धा सुरू करण्यात येणार आहे.

