प्रतापियन नंदकिशोर पाटील एन डी ए परीक्षेत अव्वल
अमळनेर:-
येथील गलवाडे ता. अमळनेर येथील रहिवासी व खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप कनिष्ठ महाविद्यालयातील माजी विद्यार्थी नंदकिशोर योगेश पाटील याने एनडीएच्या परीक्षेत यश प्राप्त केले असून त्याची ऑल इंडिया रँक 245 आली आहे.
नंदकिशोर पाटील हा यावर्षी मार्च 2024 मध्ये झालेल्या १२ वीच्या परीक्षेत तो विज्ञान शाखेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. इंडिया साठी निवड होणारा नंदकिशोर हा पहिला विद्यार्थी ठरला आहे.त्याने कोणताही क्लास न लावता सदर यश संपादन केले आहे.या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी जैन, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. उल्हास मोरे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. वसंत एस. पाटील, खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, व्हाईस चेअरमन नीरज अग्रवाल, संचालक मंडळाचे सदस्य डॉ. अनिल शिंदे , श्री.हरि भिका वाणी, श्री.योगेश मुंदडे , श्री प्रदीप अग्रवाल सर्व पदाधिकारी, सर्व प्राध्यापक गावासह परिसरातून नंदकिशोरचे अभिनंदन केले आहे.

